कन्यादान

कन्यादान आपली भारतीय संस्कृती निरनिराळ्या परंपरेने नटलेली आहे. प्रत्येक राष्ट्र स्वताःची एक परंपरा प्रदर्शित करतो आणि त्याच परंपरेचा ,रीतिचा आपण वारसा आजन्म पळतो . आपली परंपरा जपणे ही चांगली गोष्ट आहे पण परंपरेचा अर्थ समजुन ती जपणे ही जास्त चांगली गोष्ट आहे. परंपरेनुसार बऱ्याच गोष्टींचे अंधश्रद्धेत रूपांतर झाले आहे आणि आपण त्याचा इतिहास न जाणता तीच श्रद्धा पुढे वाढवतो. बऱ्याच गोष्टी आपल्याला पटत नसूनही आपण त्या गोष्टी पाळतो कारण परंपरा म्हणून. जी परंपरा आपल पूर्ण खानदान जापत आल त्याला आपण विरोध कसा करणार. मला अशीच एक पद्धत पटत नाही ती म्हणजे कन्यादान. ...