प्रगत समाज नाही प्रगत विचार करायची गरज आहे
प्रगत समाज नाही प्रगत विचार करायची गरज आहे प्रगत म्हणजे चांगला बदल जो आपल्याला एक नविन ओळख देतो. आजकालच्या जगात सर्वजण समाज प्रगत करण्याच्या मार्गात आहे पण समाजाला प्रगत करण्यापेक्षा स्वतःला आधी प्रगत करने गरजेचे आहे .आपण किती उच्च पदावर काम करतो ,किती सुशिक्षित राहतो , किती पैसे कमावतो म्हणजेच प्रगत नाही तर आपल पद वागणुकीवरून ठरत ,आपला सुशिक्षितपणा स्त्रीयांचा आदर करुण दाखवावा आणि पैशांची धुंदी विसरून माणुसकीची भावना जपवि तेव्हा कुठे प्रगत हा शब्द योग्य ठरेल . आपल्या समाजात अजुनसुद्धा स्त्रीयांवर खुप अत्त्याचार होत आहेत . तरी आपण ते तसेच सहन करत आहोत स्त्रीचा दोष काय आहे ,ती स्त्री म्हणून जन्मली हा का ती सुंदर दिसते हा , काय चूक आहे ?आज समाजात अशी परिस्तिथी आहे की स्वतःची म्हंटल की बहिन बायको आणि आई पण दुसऱ्यांची म्हंटल की खेळण जे कधीही घेतल , त्याच्याबरोबर कसही वागल आणि शेवटी फेकून दिल . हे अस वागुन को...