प्रगत समाज नाही प्रगत विचार करायची गरज आहे

प्रगत म्हणजे चांगला बदल जो आपल्याला एक नविन ओळख देतो. आजकालच्या जगात सर्वजण समाज प्रगत करण्याच्या मार्गात आहे पण समाजाला प्रगत करण्यापेक्षा स्वतःला आधी प्रगत करने गरजेचे आहे .आपण किती उच्च पदावर काम करतो ,किती सुशिक्षित राहतो , किती पैसे कमावतो म्हणजेच प्रगत नाही तर आपल पद वागणुकीवरून ठरत ,आपला सुशिक्षितपणा स्त्रीयांचा आदर करुण दाखवावा आणि पैशांची धुंदी विसरून माणुसकीची भावना जपवि तेव्हा कुठे प्रगत हा शब्द योग्य ठरेल .
आपल्या समाजात अजुनसुद्धा स्त्रीयांवर खुप अत्त्याचार होत आहेत . तरी आपण ते तसेच सहन करत आहोत स्त्रीचा दोष काय आहे ,ती स्त्री म्हणून जन्मली हा का ती सुंदर दिसते हा , काय चूक आहे ?आज समाजात अशी परिस्तिथी आहे की स्वतःची म्हंटल की बहिन बायको आणि आई पण दुसऱ्यांची म्हंटल की खेळण जे कधीही घेतल , त्याच्याबरोबर कसही वागल आणि शेवटी फेकून दिल . हे अस वागुन कोणत मोठ कार्य केल्याच वाटत काय माहीत ? जेव्हा घरच्यांबरोबर असताना कोणी वाइट नजर टाकली तर लगेच तळपायची आग मस्तकाला जाते ,सगळे पेटून उठतात मग हीच नजर दुसऱ्यांच्या मुलींवर टाकताना ह्याचा विचार का नाही येत ?
कश्मीरच्या ८ वर्षाच्या आसिफाची काय चूक आहे ? ज्या वयात बाहुलीबरोबर खेळायच असत त्या वयात समजाकडून अशी वागणूक मिळते ती नेहमीप्रमाणे बकर्यांमागे जंगलात गेली न तीच अपहरण होत तिला मंदिरात कोंडुन थेण्यात येत आणि ५ -६ दिवसाने तिला जंगलात टाकल जात तेव्हा हा समाज झोपलेला असतो का ? मंदिर सारख्या पवित्र ठिकाणी अशी वागणूक करताना कशाचीच भीति कशी वाटत नाही ? एखाद्या स्त्रीने शनिशिंगणापुर मधे दर्शनासाठी प्रवेश केला तर स्त्रीच्या प्रवेशाने मंदिर अपवित्र झाल असा देखील आरोप सुद्धा सहन हे एक स्रीवरच होतो जर स्त्रीच्या प्रवेशाने मंदिर अपवित्र होत असेल तर त्या चिमुकालीला मंदिरात बंदिस्त करुण तिच्यावर अत्याचार केल्याने मंदिर पवित्र होत का? एका बाजूने म्हणता की स्त्रीच्या प्रवेशने मंदिर अपवित्र होते मग त्याच स्रीवर मंदिरात अत्याचार करता। ..... एवढ सगळ करुण तिचा चेहरा ओळखायल येऊ नये म्हणून त्या चेहऱ्यावर दगडाने वार केला जो चेहरा तुम्ही क्षणाक्षणाला पाहता त्याची काळजी करता मग तिचा चेहरा ख़राब करताना तुमचे हाथ का थरथरले नाहीत जसा रोज़ आरश्यात चेहरा बघता ना तस आपली नियत पण बघत चला काय माहित चेहऱ्याप्रमाणे ती सुद्धा सुंदर होईल
कोपार्डीप्रकरण १५ वर्षाच्या मुलीवर अत्याचार केला आणि तिचा निर्दयपणे खून करुण टाकला ती मुलगी तिच्याआजिकडे मसाला आणण्यासाठी निघाली न परत आलीच नाहीं समाजाने हिला न्याय मिळवून देण्यासाठी १६ महिन्यांचा कालावधी घेतला तेही हिची केस उच्च न्यायालयाकडे गेल्यावर एखाद्या मुलीवर झालेल्या अन्यायला न्याय मिळवून द्यायला सरकार जर इतका वेळ घेत असेल तर ह्या न्याय व्यवस्थेला दंडवत घातल पाहिजे
दिल्लीमधील २०१२ चे प्रकरण ती बसमधून रात्रीची एकती प्रवास करताना दिसली की तिच्यावरदेखील सगळ्याने मिळून अत्याचार केला का बर तुम्हाला तीच्यामधे तुमची बहिन दिसली नाही तिच्याशी निर्दयपणे वागताना स्वताच्या बहिणीची क्षणाची पण आठवण झाली नाही का ?
आपण आपल्या कुटुंबाबरोबर असताना जर कोणाची वाकडी नजर पडली तर लगेच त्या माणसावर आपले डोळे दरड़ावतात आणि त्यांच्या त्या नजरेतून आपण त्याना वाचवतो मग हाच प्रयत्न ती एकटी असताना तिला वाचवण्यासाठी का करत नाहीत तुम्ही ? प्रयत्न करायच लांब पण तुम्हीसुद्धा तुमची नजर तशीच बनवता
आजदेखील समाजात अशी परिस्थिति आहे की मुली संध्याकाळी एकती बाहेर पडायला घाबरते ती नजर आपल्यावर पडू नये म्हणून मुली मनसोक्त वागण्यापासून थांबतात म्हणूनच आज हा विचार आला की समाज प्रगत बनवायचा असेल तर टेक्नोलॉजी , सुशिक्षितता ह्या सगळ्या गोष्टींची गरज नाही गरज आहे तर ती आपली नजर आणि नियत बदलायची ह्या दोन गोष्टी जर बदलल्या तर समाज आपोआप खऱ्या अर्थाने प्रगत होईल "बेटी बचाओ , बेटी पढ़ाओ "ह्या संदेशापेक्षा समाजाला "नजर बदला ,नियत बदला ,समाज बदलेल ",ह्या संदेशाची जास्त गरज आहे जर खरच हा संदेश सर्वलोकांपर्यंत पोहोचला आणि बदल घडला तर समाज खऱ्या अर्थाने प्रगत होईल ......
" ए खुदा काश ऐसा आएना बना दे
जो चेहरा नहीं नियत दिखा दे....... "

👍👍👌
ReplyDelete