नमस्कार सर , आज बघता बघता ४ वर्ष निघून गेली मला SVIT सोडून आणि तुमची माजी विद्यार्थिनी बनुन . पण आजदेखील वाटत कि मी आणखी SVIT मध्येच आहे, तुमची विद्यार्थिनी आहे . ह्याच एकमेव कारण म्हणजे कॉलेज सुटल्यानंतर देखील लाभलेलं तुमचं मार्गदर्शन , पाठिंबा ,व प्रत्येक क्षेत्रात मिळालेलं प्रोत्साहन . खरंतर ह्या सगळयांबाबद धन्यवाद म्हणायला गेले तरी तेही कमी पडेल . कारण ह्या सपोर्टची तुलना कोणत्याच शब्दाने होणं शक्य नाही . खरंतर आज ७ वर्षांनी धाडस झालं आहे तुमच्याबद्दलचा अनुभव लिहायला आणि आभार मांडायला . नाहीतर आत्तापर्यंत काही बोलावसं वाटलं कि २ nd वर्षाचा पहिला दिवस आठवायचा आणि लिहायला घेतलेला पेन खालीच रहायचा . तुमच्या लक्षात नसेल तो दिवस पण माझ्या मात्र कायमचा आणि आठवणीतला तो एक दिवस आहे . तर झाल असं कि २ nd इयर ला यायच्या आधी मी सिनिअर्स ला विचारून घेतला कि कोण कोण सर आहेत डिपार्टमेंट ला ,कोणता सबजेक्ट शिकवतात , कसे...
Posts
Showing posts from July, 2021