नमस्कार सर ,
       
                   आज बघता बघता ४ वर्ष निघून गेली मला SVIT सोडून आणि तुमची माजी विद्यार्थिनी बनुन . पण आजदेखील वाटत कि मी आणखी SVIT मध्येच आहे, तुमची विद्यार्थिनी आहे . ह्याच एकमेव कारण म्हणजे कॉलेज सुटल्यानंतर देखील लाभलेलं तुमचं मार्गदर्शन , पाठिंबा  ,व प्रत्येक क्षेत्रात मिळालेलं प्रोत्साहन . खरंतर ह्या सगळयांबाबद धन्यवाद म्हणायला गेले तरी तेही कमी पडेल . कारण ह्या सपोर्टची तुलना कोणत्याच शब्दाने होणं शक्य नाही . 
                  खरंतर आज ७ वर्षांनी धाडस झालं आहे तुमच्याबद्दलचा अनुभव लिहायला आणि आभार मांडायला . नाहीतर आत्तापर्यंत काही बोलावसं वाटलं कि २ nd वर्षाचा पहिला दिवस आठवायचा आणि लिहायला घेतलेला पेन खालीच रहायचा . तुमच्या लक्षात नसेल तो दिवस पण माझ्या मात्र कायमचा आणि आठवणीतला तो एक दिवस आहे . तर  झाल असं कि २ nd इयर ला यायच्या आधी मी सिनिअर्स ला विचारून घेतला कि कोण कोण सर आहेत डिपार्टमेंट ला ,कोणता सबजेक्ट शिकवतात , कसे शिकवतात , आणि माझा मुख्य प्रश्न म्हणजे किती कडक शिस्तीचे आहेत . न जवळपास मी जेवढ्या सिनिअर्स ला विचारला त्यांच्या कडून मला हेच ऐकायला आलं कि आपल्या डिपार्टमेंट ला बनसोडे सर आहेत खूप कडक , अभ्यास वेळच्या वेळी लागतो नाहीतर उठाबशा , वेळेच्या बाबतीतही तंतोतंत आहेत तासाला उशीर झालेला चालत नाही , पण पण शिकवण्यात मात्र खूप भारी एकदा शिकवणेला कन्सेप्ट २ ३ वेळा स्वतः आपल्याकडून रिपीट करून क्लिअर करून सांगतात . एकदा शिकवायला लागले कि तास कसा जातो  कळत  नाही . हे सर्व ऐकून मनात थोडी भीती भरलीच पण तेवढीच तुमच्या पहिल्या lecture ची आतुरता पण लागली . २ nd इयर ला आलो पहिल्याच दिवशी गोरे सरांनी टाइमटेबल दिल . वाटलं आज तास आहे सर येतील वर्गावर आणि सरांची ओळख होईल आणि सिनिअर्स च्या गोष्टी मनात घेऊन शांत बसलो . पण नंतर कळलं कि तुम्ही ५ ७ दिवसांसाठी रजेवर आहेत आणि मग काय पहिला आठवडा असाच निघून गेला आणि सिनिअर्स च बोलणं पण विसरल्यागत झालं . पुढच्याच आठवड्यात पहिल्याच दिवशी तुम्ही वर्गावर आलात lecture  नसताना व पूर्ण वर्गाचा क्लास घेतला . सर्वाना उभा केल अर्थात चूक आमचीच होती कि सर वर्गावर आले नाहीत म्हणून गोंधळ घालत बसलो होतो . त्यातून पण मी उभं असून माझं आवडीचं काम (गप्पा मारणे ) चालूच , ईश्वरी ला म्हणत होते कि हेच वाटत आपले क्लास टीचर "बनसोडे सर " आणि तेवढ्यात तुम्ही माझी चुळबुळ पकडली  न एकाच वाक्यात बोललात "गप्पा मारायच्या असतील तर बाहेर जाऊन मारू शकता , माझ्या क्लास मध्ये मला गप्पा मारलेल्या चालत नाहीत ". हे ऐकून पटकन तोंडातून सॉरी सर  बाहेर पडलं मन खाली गेली , डोळे गच भरले आणि बॅकग्राऊंड ला सिनिअर्स च बोलणं ऐकायला येऊ लागल आणि एक एक शब्द खरा वाटू लागला . 
                       त्यानंतर आणखी एक गोष्ट घडली म्हणजे तुम्ही क्लास टीचर असल्यामुळ आमचे आधीचे रोल नंबर बदलले न त्यामुळे ईश्वरी ची batch बदली . तेव्हा तर असं वाटू लागला कि सर काय आपला बदला घेत आहेत का पहिल्या दिवशीचा . (कारण ह्या आधी दोन दा  क्लास मध्ये तुम्ही बोलला पण होतात कि बेस्ट फ्रेंड्स च्या जोडया तुम्ही तोडणार आहेत ) अन जर असं असेल तर अंकिता संपली तू .. १ आठवड्यात एवढे वाईट अनुभव आलेत कि २ इयर कास जाणार ह्यांच्या हाताखाली . ह्या गोष्टी  खरं आज आठवताना ,लिहिताना हसू जरी येत असाल तरी त्या वेळी ते खूप भयानक होत .खूप भयानक ! तुमच्या केबिन मध्ये यायचा झालं तर मी तर गणपती ला पाय पडून यायचे कि देवा आत सर चिडतील असं काही माझ्या हातून घडु देऊ नको please देवा please . आणि आज त्याच केबिन मध्ये यायला त्रासतो  आम्ही  असं वाटत पुन्हा एकदा ऍडमिशन घ्यावा तुच्याकडून इलेक्ट्रिकल आणि कोम्मुनिकेशन शिकून घ्यावा . 

                        ते म्हणतात ना गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी तस . २ nd इयर च पहिला सेम काढलं कसं  बस आणि आलो ४ थ सेम ला आणि कोम्मुनिकेशन subject चालू झाला' आणि आम्ही हळू हळू ह्या सुबजेक्ट मध्ये तुमच्या शिकवण्याच्या पद्धतीमध्ये रमू लागलो आम्ही . तुमचा lecture रोज असावं असं वाटू लागला . कारण ते एक तासात  lecture मध्ये १० मिनीट आधीची revision  ४० मिनिट जे syllabus  आहे ते न १० मिनिट एक्सट्रा नॉलेज असायचा .  आणि ह्याचसोबत हळू हळू भीती नष्ट होऊ लागली (आदरयुक्त भीती आज देखील आहे )आणि नवीन काहीतरी शिकू माहिती गोळा करू ह्याची आस लागली . भीतीदायक वाटणे सर आता आदर्श सर बनले . आजदेखील diagram बुक असेल ,प्रॅक्टिकल्स ला जर्नल वेळच्या वेळी चेक करून घेणे असेल किंवा ब्लॅकबोर्ड वर जाऊन diagram काढणे असेल ह्या सगळ्या गोष्टी आठवणीत रुतून बसल्या  .

                     खरंतर खूप कमी लोक आहेत माझ्या आयुष्यात ज्यांचा सल्ला / मत मला खूप महत्वाचं वाटत आणि त्यातले तुम्ही एक आहेत . कॉलेज मध्ये असताना प्रत्येक टॉपिकस ची एक्सपेरिमेंट ची आलेली अडचण दूर केलीच सोबत आयुष्याचे धडे पण शिकवले . एक चांगला इंजिनिअर कसा होईल ह्यासोबतच एक चांगल व्यक्तिमत्त्व म्हणून कस जगाता  येईल  ह्याची देखील शिकवण दिली . डिप्लोमा कॉलेज नंतर कोणत्या कॉलेज मध्ये ऍडमिशन घ्याचा इथपासून ते आज गव्हर्नमेंट स्टडी / TCS मध्ये प्लेस होईपर्यंत सर्व प्रवासात साथ दिलीत  , वेळोवेळी मार्गदर्शन दिल , प्रोत्साहन दिल ह्या बदल खरंच खूप खूप आभारी आहे . खरतर तुम्ही जितका शिकवलं आहे त्याच्यासमोर TCS  मध्ये प्लेस होणं हे काहीच नाही सध्याच्या सिटूएशन मूळ हि फक्त एक रुवात केली आहे तुम्ही केलेल्या संसकारचे शिकवणीचे ऋण एवढ्या छोट्या सुरुवातीने उतरणार नाहीत त्या साठी मला गव्हर्नमेंट ऑफिसर व्हावंच लागेल आणि त्या दिशेने प्रयत्न पण चालू आहेतच लवकरच तो क्षण येईल . 

                    आज माझ्या जॉइनिंग चा पहिला दिवस आहे(pre joining आली ) माझ्या आयुष्यातला नवीन turning पॉईंट चालू होत आहे TCS  जॉईन करून . आणि ह्याची सुरुवात तुम्हाला आत्तापर्यंत च्या मार्गदर्शनाबद्दल आभार मानून  करायची होती . खरतर joining आधी भेटून ह्या सगळ्या गोष्टी बोलायच्या होत्या पण covid  मुळे ते शक्य झालं नाही . covid कमी झाल्यावर नक्कीच कॉलेज मध्ये  घेईल . 

              खूप खूप धन्यवाद सर ! मला खात्री आहे असाच मार्गदर्शन मला आयुष्यभर मिळेल ह्याची !



                                                                                                                तुमची विद्यार्थिनी (माजी नाही हा मी)
                                                                                                                      अंकिता (Batch २०१७)
                    















Comments

Popular posts from this blog

Maze baba

मला जन्म घेऊ दे

कन्यादान