कन्यादान

                                                                    कन्यादान 


                          आपली भारतीय संस्कृती निरनिराळ्या परंपरेने नटलेली आहे. प्रत्येक राष्ट्र स्वताःची एक परंपरा प्रदर्शित करतो आणि त्याच परंपरेचा ,रीतिचा आपण वारसा आजन्म पळतो  . आपली परंपरा जपणे ही चांगली गोष्ट आहे पण परंपरेचा अर्थ समजुन ती जपणे ही जास्त चांगली गोष्ट आहे. परंपरेनुसार बऱ्याच गोष्टींचे अंधश्रद्धेत रूपांतर झाले आहे आणि आपण त्याचा इतिहास न जाणता तीच श्रद्धा पुढे वाढवतो. बऱ्याच गोष्टी आपल्याला पटत नसूनही आपण त्या गोष्टी पाळतो कारण परंपरा म्हणून. जी परंपरा आपल पूर्ण खानदान जापत आल त्याला आपण विरोध कसा करणार. मला अशीच एक पद्धत पटत नाही ती म्हणजे  कन्यादान.

                      कन्या म्हणजे" मुलगी " आणि दान म्हणजे आपली " एखादी गोष्ट कायमस्वरूपी दुसऱ्याला स्वाधीन करणे " कन्यदान हे वस्त्रदान , रक्तदान ,नेत्रदान  , अन्नदान ,धनदान ह्या सगळ्यात श्रेष्ट दान मानले जाते. कारण हे सर्व प्रकारचे दान आपण तेंव्हा करतो जेंव्हा त्याचा साठा  आपल्याकडे असेल पण कन्यादानाचे अस नाही एकुलती एक असो वा पुर्ण ख़ानदानात एकूलती असो तिचे कन्यादान हे करवेच लगते.  कन्यादान ह्या परम्परेच्या नावाखाली मुलीच्या बापला मिळणारी वागणूक मला मान्य नाही. भारतीय परंपरेनुसार मुलीच्या लग्नाच्या दिवशी तिचे कन्यादान केले जाते। ज्या मुलीला आपण 20 -25 वर्ष तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतो , सांभळ करतो. साधी सर्दी जरी झाली तरी अापल काळीज हळहळ करते त्या मुलीला आपण दुसऱ्याच्या स्वाधीन करतो.  कन्यादानाच्या वेळेस मुलीच्या वडिलाने जावयाचे दुधानी पाय धुवायचे , अन त्यांना नमस्कार करायचा. 
जो मुलगा आपल्या मुलांच्या वयाचा आहे त्याचे पाय धुने कितपट योग्य आहे। का तर आता आपली मुलगी ते संभाळनार  म्हणून. आपण आपली मुलगी दुसऱ्याच्या घरी देता म्हणजे आपण त्यांच्या वर उपकार करतो ते नाही .उलट आपली मुलगी आपल कम्फर्ट जोन सोडून नवीन दुनियेत प्रवास करणार ह्याचा अभिमान वाटायला पाहिजे .
        
                    लेकिच अन बापाच खुप छान नात असत। मुलीच्या चेहऱ्यावरती हसू बघण्यासाठी बाप काहीही करतो , तिच्यासोबत नसले तरी ती नेहमी  आनंदात कशी राहिल त्याच्याकडे ते जास्त लक्ष ठेवतात.  एखाद्या वेळेस मुलगी रात्री बाबाना न भेटता लवकर झोपली तरी बाबा स्वतालाच दोषी मानतात न म्हणतात आज मला कामावरून यायला उशीर झाला का ? जिला पाहिल्याशिवाय तुमचा दिवस उजडत नाही , जिला मिठी मारल्याशिवाय तुम्ही जॉबला जात  नाही त्याच मुलीला दुसऱ्याकडे सोपवायला का तयार होता. मुलीला कोणीही तिला काहीही म्हणाल तरी चालत पण जर कोणी तिचा बाबाबदल कोणी काय जरी म्हणाल तरी ती  त्याला सोडत नाही मग ती आई असो वा आजी त्यांना ती लगेच उत्तर देते. मुलीसाथी  तिचे बाबा हेच तिचे हीरो असतात इतकच नाही तर तिला तिचा लाइफपार्टनर पण तिच्या बाबांसारखाच हवा असतो. बाबाच न मुलीच खुप छान नात आहे।  पण हे फ़क्त तिच्या लग्नपर्यंतच.......                     
                  का बर आपल २०-२५ वर्षाच नात एका रीतिमुळे बदलते। ज्या मुलीला बाबानी कधी कोणासमोर नमलेल आवडत नाही त्याच मुलीसमोर  आपन आपल्या जावायचे पाय धूताना  मुलीच्या मनात काय चालू असते ह्याचा विचार कधी केला  आहे का ? मुलीची बिदाई करताना आपन सहज म्हणून जातो तुला सासरे देखील तुझया बाबांसारखेच आहेत। पण खर तर ती  त्यांची जागा कोणालाच देत नाही आयुष्यभर। आपल्या मुलीच लग्न आहे ही घरातल्यांसाठी खुप आनंदाचा दिवस असतो पण बाबांसाठी सगळ्यात दुःखाचा दिवस असतो.
आपल्या मुलीच लग्न आहे म्हणून ताट मानने मंडपात फिरायच सोडून बाबा काय करतात तर मंडपात आलेल्या पाहूनेंच लग्नाला आल्याबदल आभार मानत बसतात. एवढच नहीं तर मुलाकड्च्यांसमोर मान नमवून असतात.
मुलीचा बाबा असणे  हा काय गुन्हा आहे काय ?

                ही पद्धत किती  दिवस जपणार आहोत आपन। जावयाचे पाय धुतल्याने ते आपल्या मुलीचा आयुषभर संभाल करणार ह्याची काय गॅरेंटी आहे। जर एखाद्याचे पाय धुतल्याने तो व्यक्ति आपल्या मुलीला दुःख न देता संभाला असता तर घटस्फोट , छळ हया गोष्टी अजुन का चालतात। समाजाला बदलायची वेळ आली आहे। 
ज्या रीतीचा  आपल्याला इतिहास माहिती नाही त्याचा इतिहास जनून घेऊन त्या जपने आणि अाश्या अनेक रितिचा ज्याचा काहीच अर्थ नाही त्यांचा विसर पडने ही समाजाची गरज केली पाहिजे  मग बघा मुलगी कधीच दुसऱ्या घरी जायाला घाबरनार नाही.  सध्याचा समाज खुप बदलत आहे हा पण एक बदल करुण बघा समाज कुठे पोहचेल .. 

              मुलगी ही कधीच कोणाच ओझ नसते। ती जन्माला एकटी  येते पण मारताना मात्र कमावलेली नाती , एक नविन आठवण माघे ठेऊन जाते ... 
मुलीची किंमत आणि ती असल्याचा आनंद फक्त तिच्या बाबानाच माहिती असतो.

                                         लेक माहेरच सोन।.... 
                                         लेक सौख्याच औक्षण ... 
                                         लेक बसरीची धुन .....
                                         लेक अंगणी पैंजन .....
                                         लेक चैतन्याचे रूप ........
                                         लेक अल्लाद चांदन........ 
                                         लेक रंगाचे शिंपण ......
                                        लेक गंध हळव मन....... 
                                          लेक परक्याचे धन ........
                                         बाबा तुटतो अतुन ........
                                         आला गोठलेला  क्षण....... 
                                           शुभमंगल कन्यादान........    कन्यादान .........




                   
   



                    

                        

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Maze baba

मला जन्म घेऊ दे