मला जन्म घेऊ दे

                                     मला जन्म घेऊ दे 




तू जसे पाहिले जग तस मला पाहु दे  ,
नको मारु आई मला जन्म दे।


परमेश्वर प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही 
त्याच्या जागी तू आहे हे  तुला कळू दे 

आई सर्व माझ्या आनंदाने मला न्हाऊ दे 
नको मारु आई मला जन्म हा घेऊ दे 

हुंडा मागतात मोठा म्हणून माझा त्रास वाटतो का 
झरा तुझा मायेचा म्हणून असा आटतो का 

दादाच्या राखीसाठी निदान मला येऊ दे 
नको मारु आई मला जन्म हा घेऊ दे 

तू बहिन , तू कन्या  , तू एक स्त्री आहे 
काल जिथे तू होतीस तिथे आज मी आहे 

तू जसे विणले नाते तस मला देखील विणु दे 
नको मारु आई मला जन्म हा घेऊ दे 

पहा मग फिरून मी पुन्हा कधी येणार नाही 
भाग्य कन्यादानाचे तुला कधी मिळणार नाही 

डोळे येतात भरून तेव्हा तुझा पदर मला होऊ दे 
नको मारु आई मला जन्म हा घेऊ दे




Comments

Popular posts from this blog

Maze baba

कन्यादान