देश अनाथ झाला
पदरी घेऊन अनेकांना हजारोंचे केले संगोपन ,
संघर्षातून उभाराहून विश्व अनाथांना दिले बालपण ,
गोटातून सुरुवात तिची आशेचा किरण तिने पेटवला ,
अनाथांचा सूर्य आज काळोखाच्या ढगांमध्ये हरपला .
माई गेल्याची बातमी ऐकली अन डोळ्यातून पाणी थांबेना . माणसाचं आयुष्य आहे एकदिवस जाणारच आहे , पण तत्वची , विचारांची मानस गेले कि मनात कायम वेदना होतात . ह्या क्षणाला सुद्धा वाटत आहे हि हे निव्वळ एक वाईट स्वप्न होत अन डोळे उघडून पाहावे अँड वाईट स्वप्न विसरून जावे .
माईचा जन्म १४ नोव्हेंबर १९४८ साली झाला . जन्मताच जणू गरिबीने मिठी मारली होती . गरीब कुटुंबात जन्म झाल्याने बालपण मात्र चिंधीचे कपडे घालण्यात गेले . घरची परिस्थिती सुधारण्यासाठी आपण शिकावं आणि घर सावरावे असं कायम वाटायचे आणि त्याला वडिलांचा पाठिंबा पण मिळाला . गुरे चारायला निम्मिताने बाहेर शाळेत शिकायला पाठवायचे . पण घरची आर्थिक स्थिती व्यवसाठीत नसल्याने आईने मात्र विरोध केला . पुढे माईच्या शिक्षण खाल्ली बसली .
पुढे अवघ्या ९ व्य वर्षी त्यांच्या हुन २६ वर्षे मोठे असलेल्या श्रेधार सपकाळ शी लग्नाच्या बंधनात अडकवले गेले . अगदी बाहुलीच्या सोबत संसार थाटायचा वयात आयुष्याच्या संसाराचे धागे आले . अशा परिस्थितीत जीवनाचा खूप कठीण सामना करावा लागला त्यात त्यांनी कधीच हार मानली नाही . त्याच्यातच ते म्हणतात ना नशिबाचे भोग भोगावेच लागतात त्याच प्रमाणे २० वर्षी माई गरोदर असताना एका परक्या व्यक्तीच्या सांगण्याहून स्वतःच्या नवऱ्याने ९ महिन्याच्या ग्रोशार माई ना घर बाहेर काढले . जीवनसाथीदारानेच घराबाहेर काढले तर समाज तर काय करणार . सगळ्या गावकरांनी सुद्धा माई ना गावातून काढले . त्याच परिस्थिती माई एका गोठ्यात स्वतःची डिलिव्हरी केली . गायीच्या गोठयामध्ये मुलीला जन्म दिला न तिथून खरी सुरुवात झाली सिंधुताई ते माई .
शिक्षण काही नसल्याने कुठं काम करायचा हा प्रश्न होताच . सोबत आटा एकटी नाही तर मुलीचीसुद्धा जबाबदारी होती . कित्येक दिवस सुरुवातीचं इवलासा लेकरू पोटाला धरून रेल्वे रुळावर बसून , स्मशानभूमीत राहून काढले . पोटातली आग मात्र जगू देत न्हवती . कित्तेक दिवस कोणीतरी आपल्याला खायला विचारावं , आपल्याला घरी घेऊन जावं कोणाच्या तरी असं वाटायचं पण देवाने मात्र तो दिवस कधी उघडू दिला नाही . हळू हळू जशी मुलगी चालू लागली माई मंदिरात झाडू मारू लागले त्यातून २ वेळच जेवण मिळेल का ह्या आशेने काम करू लागल्या . कित्येकदा मनात विचार आला कि आटा संपवावा सगळं सहन होत नाहीये .पण पुन्हा त्यातून सावरून पुन्हा विचार केला व स्वतः जीव द्यायला माई जीव देणाऱ्यांना वाचवू लागल्या .
आणि एक नवी सुरुवात झाली . माई आपण ज्या परिस्थितीमधून गेलो आहे ते कोणाला जात काम नये म्हणून अनाथ मुलांच्या शोधात निघाल्या . स्वतःच्या मुलींमध्ये आणि अनाथ मूलांमध्ये भेदभाव होऊ नये म्हणून माईंनी स्वतःच्या मुलीला एका मंदिरात ठेवले . तिथल्या पुजारींना तिची काळजी घ्यायला लावली . अशा प्रकारे निस्वार्थी पणाने कित्तेक मुलांना घर दिले मायेची ऊब दिली . स्वतःची झोळी अनाथ मुलाच्या कल्याणासाठी सगळ्यांसमोर झुकवली . ह्याच कार्यामुळे समाजामध्ये माणुसकी पुन्हा उभी राहिली .
आजचा दिवस काळोखाचा दिवस बनून गेला . आज मायेची ऊब हरवली . आज खऱ्या अर्थाने देश अनाथ झाला .
मतलबी दुनिया मधून मायेची ऊब हरवलीय ,
हजारो अनाथांचे हरपले ,
जणू काही माणुसकी पोरकी झालीय ,
आपली माई आपल्याला सोडून गेलीय .
माईने दिलेले आत्मनिर्भरतेचे धडे निरंतर आपल्या स्मरणात राहतील . ईश्वर माई च्या आत्म्याला शांती देवो . ओम शांती !!!
👍👌
ReplyDeleteA tribute to the selfless soul, a testament that shows a selfless life with an indomitable will. 💐
ReplyDelete👌👌👍👍
ReplyDelete